निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे खून प्रकरण:
सांगोला पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) दि. ०२/०८/२०२३ रोजी रात्री ०९/३० वा. ते दि. ०३/०८/२०२३ रोजी पहाटे ०४/३० वा. चे दरम्यान फिर्यादी यांचा चुलत भाऊ नामे सुरज विष्णु चंदनशिवे वय ४३ वर्षे, रा. वासुद ता. सांगोला जि. सोलापुर हा त्यांचे राहते घरामधुन जेवण करुन फिरण्यासाठी गेला तो रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने आम्ही व आमचे नातेवाईक
यांनी त्यांचा शोध घेतला असता वासुद गावचे शिवारात आप्पासो केदार यांचे शेताजवळ वासुद ते केदारवाडी रोडवर सुरज विष्णु चंदनशिवे यास कोणीतरी अज्ञात इसमाने, कोणत्यातरी अज्ञात धारदार हत्याराने, अज्ञात कारणावरुन डोक्यात व पाठीत मागील बाजुस वार करून गंभीर दुखापत करून त्यांचा खुन करुन त्यांचे प्रेत पुरावा नाहीसा
करण्याच्या उद्देशाने आप्पासो रामचंद्र केदार यांचे उसाचे शेती गट नंबर ९६३ मौजे वासुद यामध्ये ओढत फरफटत घेवुन जावुन टाकुन दिले आहे. अशा वगैर मजकुरची तक्रारीवरुन सांगोला पोलीस ठाणे येथे गु र नं ६८३/२०२३ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
घटनेचे गांभीर्य समजुन घटनास्थळी मा पोलीस अधीक्षक सो श्री शिरीष सरदेशपाडे, मा अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव, मा उप वि पोलीस अधिकारी श्री विकांत गायकवाड,अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक
सांगोला पोलीस ठाणे व पोलीस स्टाफ असे घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चार टिम बनवुन आरोपीत याना निष्पन्न करुन अटक करणेबाबत सुचना दिल्या. गुन्हाचे तपासामध्ये दिनांक ०३/०८/२०२३ पासुन संशयीत
इसमांकडे विचारपुस, गोपनीय बातमीदारांमार्फत प्राप्त माहीतीचे प्रथ्थकरण तसेच तांत्रिक विश्लेषन करण्यात येत होते. मयताचे गावातील इसमांसोबत असणारे आर्थिक हितसंबंध व अन्य वादविवाद याची सुद्धा खात्री करण्यात आली. आतापावेतोच्या तपासावरून गावातील इसम सुनिल मधुकर केदार यांचेशी
असलेल्या आर्थिक वादामधुन त्यांच मध्ये गतवर्षाभरापासुन तिव्र वाद सुरू होता. यासंबंधाने सखोल तपास केला असता सुनिल मधुकर केदार व विजय बबन केदार या दोघांचा या गुन्हामध्ये सहभाग असल्याचे प्राथमीक दृष्ट्या निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक १८/०८/२०२३ रोजी २२:३१ वा सदर गुन्हामध्ये अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक सो श्री शिरीष सरदेशपांडे, मा अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव, मा उप वि पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनंत कुलकणी यांचे नेतृत्वाखाली
सांगोला पोलीस ठाणकडील सहा पोलीस निरीक्षक सचिन जगताप, स पो नि हेमंतकुमार काटकर, स पो नि खरात, पोसई काशीद सहा फौज / कल्याण ढवणे, पो हे कॉ / आप्पा पवार, पो हे कॉ / दत्ता वजाळे, पो ना मोहळकर, पो कॉ मारुती पांढरे यांनी बजावली आहे


0 Comments