धक्कादायक प्रकार सोलापूर ! पतीच्या त्रासाला कंटाळून पूजा भावाकडे आली पण...
पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून भावाकडे राहण्यास आलेल्या विवाहितेवर पतीने सोलापुरात येऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
सोलापुरातील विनायक नगरमध्ये ही घटना घडली. पूजा बाळू क्षीरसागर असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती बाळू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुळच्या पंढरपूर तालुक्यातील रोपळेतील पूजाचा विवाह पंढरपुरातील बाळू क्षीरसारगर याच्याशी आठ वर्षापूर्वी झाला आहे. अनेक वर्षांपासून त्याला दारुचे व्यसन आहे. बिगारी काम करुन तो उदरनिर्वाह चालवायचा. मात्र पूजाशी तो सतत भांडायचा.
दरम्यान, या त्रासामुळे पूजा सोलापुरात नितीन खरे या भावाकडे आठ दिवसांपूर्वी आली होती. घटनेदिवशी भाऊ त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यामुळे तो रुग्णालयातच होता. घरी पूजा आणि तिचा मुलगा दोघेच होते. याच वेळी बाळू घरी आला. येथे पती-पत्नीचे जोरदार भांडण झाले.
यातच रागाच्या भरात बाळूने पूजाच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केले. जवळच राहणाऱ्या मावशी संगीता बाबरे यांना पूजावर वार झाल्याचे कळताच त्यांनी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाल्याने पूजा बोलू शकत नसल्याचे सांगण्यात आले.
0 Comments