Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. ‘शहाजीबापू, आता निधी नको, पाणी द्या'; टंचाईच्या परिस्थितीने सांगोल्यातील शेतकरी खवळला

ब्रेकिंग न्यूज.. ‘शहाजीबापू, आता निधी नको, पाणी द्या'; टंचाईच्या परिस्थितीने सांगोल्यातील शेतकरी खवळला 


गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली सांगोला उपसा सिंचन योजना त्यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागताना दिसत आहे. परंतु सध्या तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात थोड्या फार झालेल्या पावसाने सांगोला तालुक्यात २४ हजार ११७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत.

नीरा उजवा कालव्याच्या फाट्यांना पाणी येईल, आपल्या पिकांना जीवदान मिळेल, असे येथील शेतकऱ्यांना वाटत होते. नीरा उजवा कालवा पाणी वाटपामध्ये नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ पाणी वाटप झाले पाहिजे होते. परंतु या कालव्याच्या तालुक्यातील फाटा क्रमांक आठला शेवटी असूनही अद्याप पाणी मिळाले नाही. पाणी मिळाले नसल्याने या परिसरातील शेतकरी सध्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

सांगोला तालुक्यातील फाटा क्रमांक पाचवरील शेतकऱ्यांनी आंदोलनानंतर पाणी मिळविण्यात यश मिळविले आहे. आपले प्रसिद्ध आमदार असून निधी मोठ्या प्रमाणात मिळत असतानाही आपल्या हक्काचे पाणी का मिळत नाही? असा सवाल शेतकरी उघडपणे विचारत आहेत

आमदार, खासदारांचे प्रयत्न मग पाणी का नाही?

नीरा उजवा कालव्याच्या फाट्याला नियमाप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी आमदार शहाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. पाणी दिले जाईल, असे आश्वासनही मिळाले होते. तसेच, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही या भागातील शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मिळावे,

 यासाठी थेट अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना केल्या होत्या. आमदार, खासदारांनी प्रयत्न करून, अधिकाऱ्यांना सांगूनही नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना पाणी का मिळत नाही? 'पाण्यात राजकारण की राजकारणात पाणी मुरतंय' हेच येथील शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.

Post a Comment

0 Comments