आयुष भारत एज्युकेशन ग्रुप कडून राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना 6 कोटी 73 लाख 987 रुपये शिक्षणिक कर्ज मंजूर : डॉ.अमीर मुलाणी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
आयुष भारत एज्युकेशन ग्रुप या योजनेंतर्गत राज्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना 1 लाख ते 10 लाखां पर्यंत आयुष भारत एज्युकेशन ग्रुपने 0% टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे या मध्ये दीड हजार हुन अधिक कोर्सेस उपलब्ध असणार आहेत
या योजना लाभ फक्त आयुष भारत सदस्य व पदाधिकारी व त्यांची मुली व मुले घेऊ शकता या योजनेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे या योजने मुळे हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार आहे मोजक्या कागदपत्रात 48 तासात 1 लाख ते 10 लाखां पर्यंत 0% व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे
या योजनेत समावेश असणारे सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, डिग्री कोर्स, मास्टर कोर्स, उपलब्ध असणार आहेत या योजनेचा फायदा राज्यातील जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे
अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना ज्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक आवड आहे त्या क्षेत्रामध्ये ते प्रवेश घेऊ शकतात यामध्ये इंजीनियरिंग मेडिकल ऍग्री व अन्य कोर्स उपलब्ध असणार आहे
ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आयुष भारत एज्युकेशन ग्रुपशी संपर्कही करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयुष भारत एज्युकेशन ग्रुप कडून करण्यात आले आहे. अशी माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी दिली.


0 Comments