google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त भरविलेल्या रंगभरण स्पर्धेचे निकाल घोषित दि. 03 ऑगस्ट रोजी होणार बक्षीस वितरण

Breaking News

आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त भरविलेल्या रंगभरण स्पर्धेचे निकाल घोषित दि. 03 ऑगस्ट रोजी होणार बक्षीस वितरण

 आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त भरविलेल्या


रंगभरण स्पर्धेचे निकाल घोषित दि. 03 ऑगस्ट रोजी होणार बक्षीस वितरण

सांगोला/प्रतिनिधी :(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. 30 जुलै रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला याठिकाणी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धा या तीन गटामध्ये घेण्यात आल्या असून त्याचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.

यामध्ये पहिल्या गटामध्ये म्हणजे पहिली ते तिसरी या गटामध्ये प्रथम क्रमांक- समर्थ अनिल नवले (इयत्ता- दुसरी), द्वितीय क्रमांक- सविक योगेश लोखंडे (इयत्ता- तिसरी), तृतीय क्रमांक- स्वरा किरण वाघमोडे (इयत्ता- तिसरी), उत्तेजनार्थ क्रमांक- अरोही अतुल इंगोले (इयत्ता- तिसरी), 

तसेच दुसऱ्या गटामध्ये म्हणजे चौथी ते सहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक- प्रसाद शिवाजी तोडकरी (इयत्ता- चौथी), द्वितीय क्रमांक- केतकी प्रकाश साळुंखे (इयत्ता- सहावी), तृतीय क्रमांक- श्रावस्ती उत्कर्ष चंदनशिवे (इयत्ता- सहावी), उत्तेजनार्थ क्रमांक- अनुष्का अरुण पाटील 

(इयत्ता- सहावी) व शेवटच्या गटामधील म्हणजेच सातवी ते दहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक- सृष्टी सुहास पाटील (इयत्ता- नववी), द्वितीय क्रमांक- स्नेहल शहाजी रणदिवे (इयत्ता- नववी), तृतीय क्रमांक- श्रावणी प्रमोद डोंबे (इयत्ता- दहावी), उत्तेजनार्थ क्रमांक- तेजश्री मारुती गोडसे (इयत्ता- नववी) यांना मिळाले आहेत.


दि. 03 ऑगस्ट 2023 रोजी आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त दुपारी 4 वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला याठिकाणी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी वेळेवर उपस्थित राहायचे आहे.


सदरच्या रंगभरण स्पर्धेसाठी आर.एम.जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर या स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी आनंदा (भाऊ) माने मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments