google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Breaking News

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

 डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये


अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला ,येथे "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांची जयंती व "लोकमान्य टिळक" पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सिकंदर मुलानी व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

                  महाविद्यालयाचे प्राचार्य आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट करतात की,  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचिताच्या हक्कासाठी लढणारे एक लोकनायक व क्रांतीकारी पुरुष होते. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वंचित उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जाती- जमाती व दलित माणसांचे जीवन मांडले

 त्यांच्या साहित्याला खऱ्या अर्थाने वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य अन्यायाविरुद्ध बंडखोरी करणारे व विद्रोही स्वरूपाची आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान असून परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकाची वैचारिक धार दिसून येते. असे विचार त्यांनी मांडले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजित व अनियोजित समितीचे चेअरमन दीपक रिटे यांनी केले व आभार प्रा. डॉ. तानाजी फुलारी यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित श्री. दशरथ रणदिवे, श्री. धनंजय गायकवाड, राकेश खडतरे, श्री सतीश आगवणे, श्री. बाळासाहेब कोळी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments