स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त यशोदा
हॉस्पीटलच्यावतीने रविवारी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला शहरातील स्त्रीरोग तज्ञ
डॉ. विजय बंडगर यांच्या यशोदा हॉस्पीटलच्या वतीने रविवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३या वेळेत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले
असल्याची माहिती प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. विजय बंडगर यांनी दिली.सदर शिबीरामध्ये गर्भवती महिलांची तपासणी, तसेच इतर महिलांची तपासणी सुध्दा करण्यात येणार आहे.
मासिक पाळीचा त्रास, कॅन्सर निदान व उपचार, अंगावरुन पांढरा पदर जाणे, पोटात दुखणे व इतर आजारावर मोफत तपासणी करून उपचार केले जातील.
शिबीरातील महिला रुग्णांना सोनोग्राफीची गरज भासल्यास सवलतीच्या दरात सोनोग्राफी व रक्त लघवीत पासणी केली जाईल.
त्याचदिवशी दि. ३० जुलै रोजी बाळंतपण किंवा शस्त्रक्रिया झाल्यास त्यामध्ये सवलत देण्यात येणार आहे.
तरी सांगोला शहर वतालुका परिसरातील गरजू महिला रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनडॉ. विजय बंडगर यांनी केले आहे.


0 Comments