google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी अपघात.. पायी चालत घराकडे निघालेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Breaking News

दुर्दैवी अपघात.. पायी चालत घराकडे निघालेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

दुर्दैवी अपघात.. पायी चालत घराकडे निघालेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..


सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज):- अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालत घराकडे निघालेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना लक्ष्मीनगर सोनंद ता. सांगोला येथे घडली.

 नानासो रामचंद्र रानगर (रा.लक्ष्मीनगर, सोनंद ता. सांगोला) असे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशन येथे अपघाताची फिर्याद मनोहर रानगर रा. लक्ष्मीनगर, सोनंद यांनी दिली आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, नानासी रानगर हे २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कामानिमित्त सोनंद येथे गेले होते. त्यानंतर रात्री१२.३० वाजता गावातील बसु बिराजदार यांनी 

सांगोला ते जत रोड वरील लक्ष्मीनगर सोनंद येथे नानासो रानगर यांचा अपघात झाला असून ते गंभीर जखमी होवून रस्त्यावर बेशुद्ध पडले असल्याचे फोनवरुन फिर्यादी मनोहर रानगर यांना सांगितले. 

त्यानंतर बंधू मनोहर रानगर, नातेवाईक दादासो भुसनर व अनिल रानगर यांनी जखमी नानासो यांना तातडीने उपचाराकरीता 

ग्रामीण रुझालय सांगोला येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments