google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीचे प्रलंबित बिल मिळेपर्यंत सोमवारपासून आमरण उपोषण

Breaking News

सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीचे प्रलंबित बिल मिळेपर्यंत सोमवारपासून आमरण उपोषण

सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीचे प्रलंबित बिल मिळेपर्यंत सोमवारपासून आमरण उपोषण


सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचे प्रलंबित बिल मिळेपर्यंत सोमवार दि. ३१/०७/२०२३ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे छावणी चालकांमधून सांगण्यात आले. 

याबाबत चारा छावणी चालकांच्यावतीने तहसीलदार संजय खडतरे व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे..

सन २०१८-२०१९ मधील दुष्काळी परिस्थीतीमध्ये जनावरांच्या चारा छावण्या शासनाच्या आदेशानुसार व नियमानुसार चालविण्यात आल्या होत्या. सदर चारा छावण्यांची बिले वेळोवेळी वेगवेगळया पध्दतीने मागणी करूनही अद्याप मिळाली नाहीत. 

चारा छावणी चालकांवर बँका,फायनान्स व इतर लोकांकडून उसनवारीने घेतलेल्या आर्थिक रक्कम व व्याज देणे परत वेळेत न गेल्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

 सोमवार दि. ३१/०७/२०२३ पासून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांचे प्रलंबित बिल मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. तरी आमचे अर्जाचा सहानुभूतीपूर्वक तात्काळ विचार व्हावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर श्री. चंद्रकांत करांडे, श्री. सोपान देवरे, श्री. भाऊसाहेब गायकवाड, श्री. पोपट गडदे, श्री. प्रशांत वलेकर, श्री. श्रीमंत गवंड, श्री. देविदास इंगोले, श्री. प्रविण नवले श्री. निलेश आवताडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments