ब्रेकिंग न्यूज..! कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर
सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून सर्वत्र वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर कोल्हापूर शहर महापुराच्या उंबरठ्यावर आहे. संभाव्य संकटाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यातच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे ही उघडण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातील आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
वाढत्या पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे, राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाने मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह इतर काही भागात
28 जुलैपर्यंत अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल.
विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होईल, अशी शक्यता आहे.


0 Comments