google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा होणार ‘गेम’

Breaking News

लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा होणार ‘गेम’

 लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा होणार ‘गेम’


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा अवधी शिल्लक असला तरी सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. यावेळचा मुकाबला खूपच अटीतटीचा होणार आहे.

 कारण लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये दोन तुल्यबळ आघाड्यांत थेट मुकाबला होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील एनडीए, तर दुसरीकडे विरोधकांचा INDIA आहे. दरम्यान, एनडीए आणि इंडिया बाबत एक ताजा सर्वे समोर आला आहे. याचे निकाल खूप आश्चर्यचकीत करणारे आहेत. 

जर देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २० जागांवर भाजपचा विजय होईल, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. भाजपनंतर काँग्रेसला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

शिवसेना शिंदे गटला फक्त २ जागा तर शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळू शकतील. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा पाच जागा कमी मिळणार आहे. राष्ट्रवादीत अजितदादा पवार गटाला फक्त २ तर शरद पवार गटाला ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे अजितदादा गटाला काका भारी पडणार आहेत. या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपला सर्वाधिक २० जागा मिळत असल्या तरी त्यांच्या जागा तीन ने कमी होणार आहेत. तसेच राज्यात शिंदे गट व अजितदादा पवार गटाला सोबत घेऊनही महायुतीला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीलाही २४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये ४२ जागांपैकी टीएमसी २९जागा जिंकू शकते. त्याचबरोबर भाजपच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. भाजपला १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक जागा मिळू शकते.

Post a Comment

0 Comments