google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करणेत येणार ; तहसिलदार संजय खडतरे

Breaking News

सांगोला तालुक्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करणेत येणार ; तहसिलदार संजय खडतरे

 सांगोला तालुक्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते


दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करणेत येणार ; तहसिलदार संजय खडतरे

जुलै २०२३ अन्वये ०१ ऑगस्ट "महसूल दिन" पासून "महसूल सप्ताह" साजरा करणेबाबत सूचित करणेत आलेले आहे. त्याअनुषंगाने सांगोला तालुक्यात दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करणेत येणार आहे. या महसुल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरीकांसाठी विशेष मोहिम / कार्यक्रम/उपक्रम / शिवीरे/ महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील प्रमाणे

सदर महसुल सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करणेत येणार आहेत. ९. दिनांक ०१ ऑगस्ट २०२३

• महसुल दिन साजरा करणे व महसुल सप्ताह शुभारंभ - महसुल दिनाच्या शुभारंभ दिवशी सर्व तलाठी कार्यालयाचे व मंडळ अधिकारी कार्यालयाचे ठिकाणी सकाळी ११.०० ते दु.१.०० या वेळेत कार्यक्रम आयोजित करणेत आलेला असून त्यावेळी प्रलंबित नोंदीचे फेरफार वाटप, ७/१२ उतारे वाटप, तसेच तक्रार नोंदीचे आदेश निर्गतीकरण तसेच स्मशानभूमी दहनभूमी दफनभूमीचे उतारेवर नोंदी घेवून देणेत येणार आहेत.

२. दिनांक ०२ ऑगस्ट २०२३

• युवा संवाद

सांगोला तालुकेतील विविध महाविद्यालय मध्ये ०१/०१/२०२४ ही तारीख गृहीत धरुन पात्र विद्यार्थी विद्यार्थिनीची नावे मतदार यादी मध्ये समाविष्ठ करणेसाठी फॉर्म नं. ६,७,८,८,८ ला भरुन घेणे संदर्भात सर्व महाविद्यालय मध्ये कॅम्प आयोजित करणेत येणार आहेत. तसेच इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास, नॉन क्रिमिलेअर उत्पन्न इत्यादी दाखले महाविद्यालयात शिबीर घेवून वाटप करणेत येणार आहे. तसेच तर्पण फाँऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या मदतीने अनाथ विद्यार्थ्यांना लाभ देणेचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे.

३. दिनांक ०३ ऑगस्ट २०२३

एक हात मदतीचा :-

एक मदतीचा हात या उपक्रमात अतिवृष्टी, पुर शेती व फळबागांचे नुकसानाने बाधित झालेल्या शेतक-यांना अनुदान वाटपाबाबत ऑनलाईन आर्थिक मदतीचे माहिती सांगणेत येवून त्यांना आवश्यक ती बँकांची मदत घेवून सेवा पुरविणेचे कामकाज करणेत येणार आहे. तलाठी स्तरावरील ७/१२.८अ पीक पेरा अहवाल याचे वाटप प्रत्येक मंडळाचे मुख्यालयात आलेले आहे. महसूल अदालत कार्यक्रम मंडळ स्तरावर आयोजित करणेत येणार आहे.. ठेवणेत

४. दिनांक ०४ ऑगस्ट २०२३

जनसंवाद :- आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त तक्रार अर्ज संबंधितांना उत्तरे देवून संबंधित अर्जदार ज्यांना कळविणेची कार्यवाही करणेत येणार आहे. जमीनविषयक आवश्यक नोंदी तलाठी व मंडळअधिकारी यांनी धरुन घेणेचा कॅम्प मंडळ स्तरावर ठेवणेत आलेला आहे. तसेच सलोखा योजनेबददल तलाठी कार्यालयात प्रसिध्दीकरण करुन सर्व गावी शिबीरांचे आयोजन करणेत आलेले आहे. महसूल अदालतीचे आयोजन प्रलंबित प्रकरणे निर्गत करणेचा कॅम्प मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये करणेत येणार आहे.

दिनांक ०५ ऑगस्ट २०२३

• सैनिक हो तुमच्यासाठी :-

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी समन्वय साधून तालुकेतील आजी/माजी सैनिक यांना निमंत्रित करुन त्यांचे असणा-या तक्रारी व अडीअडचणीसाठी निराकरण करणेसाठी तहसिलदार स्वत: प्रत्यक्ष सैनिक कुटुंबियाचे घरी भेटी देवून अडचणीचे निराकरण करणेचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच त्यांना आवश्यक ते दाखले वितरीत केले जाणार आहे. ६. दिनांक ०६ ऑगस्ट २०२३

• महसुल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद :-

या कार्यक्रमासाठी सर्व कार्यरत कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्यायावत करणे तसेच सेवाविषयक बाबी निकाली काढणेसाठी त्यांचे अडीअडचणी सोडवणे. तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांचे महसूल मधील तज्ञ व्यक्तीचे महसूली कामकाजाचे कायदे, संगणकीकरण इ. ऑफीस इत्यादी कार्यक्रम कार्यालयीन वेळेत आयोजित करुन कर्मचा-यांशी संवाद साधणेचा कार्यक्रम करणेत येणार आहे.

७. दिनांक ०७ ऑगस्ट २०२३

• महसुल सप्ताह सांगता समारंभ :-

सदर कार्यक्रमास लोकप्रतिनिधी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरीक, स्वयंसेवी संस्था, . सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करून महसूल विषयक सर्व सुविधांची माहिती देवून महसूल विभागाची प्रतिमा उंचावून महसूल सप्ताह सांगता समारंभ बचत भवन सांगोला येथे आयोजित करणेत येणार आहे.

तहसिल कार्यालय सांगोला च्या वतीने वरीलप्रमाणे दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते नांक ०७ ऑगस्ट २०२३ या महसूल सप्ताहामध्ये विविध घटकातील नागरीकांसाठी विशेष हिम/कार्यक्रम/उपक्रम/ शिबीरे/ महसूल अदालत यांचे आयोजन करणेत आलेले आहे. सदर महसूल सप्ताहाचा गोला तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा व महसूल सप्ताहामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी भाग घेवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन श्री. संजय खडतरे तहसिलदार सांगोला यांनी सर्व नागरीकांना रणेत आलेले आहे.

Post a Comment

0 Comments