कुर्डूवाडी गट विकास अधिकारी व फुटजवळगांव ग्रामसेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास मुंबई आझाद मैदानावर आंदोलन छेडणार :
अमीर मुलाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे केली तक्रार.
मुंबई प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेचा विषय बनलेली फुटजवळगांव ग्रामपंचायत यांच्याविरुद्धचा आणखी एक विषय पुढे आलेला असून याबाबत थेट गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या कार्याबाबत अनियमितता व संशय असल्याचे तक्रारदार व
भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीर मुलाणी यांचे म्हणणे आहे फुटजवळगांव ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कुर्डूवाडी यांनी शासकीय योजनेची माहिती लपवली जात आहे अमीर मुलाणी यांनी माहिती अधिकार व भारतीय साक्षीपुरावा अधिनियम कायद्याअंतर्गत माहिती मागण्याचा खूप प्रयत्न केला
पण फुटजवळगांव ग्रामसेवक व गटविकास अधिकारी कुर्डूवाडी शेवटी माहिती देण्यास नकार दिला भ्रष्टाचार केलाच नाही असे जर असेलच तर माहिती का लपवली जात आहे. माहिती लपवण्याचे कारण तरी काय असेल असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे जर शासकीय योजनेची माहिती लवकरात लवकर तक्रारदार यांना दिली नाही
तर गटविकास अधिकारी व ग्रामसेवक फुटजवळगांव यांच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येत आंदोलन छेडणार आहे. शासकीय योजनेची माहिती गट विकास अधिकारी व ग्रामसेवक जोरदार पद्धतीत लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गट विकास अधिकारी कुर्डूवाडी व ग्रामसेवक फुटजवळगांव यांच्या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार दिली होती मुख्यमंत्री कार्यालयाने ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तरी या आदेशाला डावलण्याचा प्रयत्न चालू आहे तरी गटविकास अधिकारी कुर्डूवाडी व ग्रामसेवक फुटजवळगांव यांची कठोर चौकशी करून सर्व शासकीय योजनेची माहिती जनतेसमोर मांडावी अन्यथा मुंबई आझाद मैदानावर अनेक संघटना सोबत घेऊन हजारोच्या संख्येने आंदोलन छेडणार आहे असा इशारा भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीर मुलणी यांनी दिला आहे.


0 Comments