google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला चारा छावणीच्या बिलाबाबत दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास जनावरे कचेरीत सोडून चक्काजाम आंदोलन करून सरकारी कामकाज बंद पाडू : दिलीपराव सावंत

Breaking News

सांगोला चारा छावणीच्या बिलाबाबत दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास जनावरे कचेरीत सोडून चक्काजाम आंदोलन करून सरकारी कामकाज बंद पाडू : दिलीपराव सावंत

सांगोला चारा छावणीच्या बिलाबाबत दोन दिवसात ठोस निर्णय न झाल्यास जनावरे


कचेरीत सोडून चक्काजाम आंदोलन करून सरकारी कामकाज बंद पाडू : दिलीपराव सावंत

सांगोला / प्रतिनिधी :सन २०१९ मधील चारा छावण्याच्या बिलासाठी सांगोला व मंगळवेढा तालुका छावणी समन्वय समितीच्यावतीने दि. २६ जुलै २०२३ पास ून तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

 प्रसासनाकडून बिलाबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी चारा छावणी समितीला नोटीस देऊन आंदोलनापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र देण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी चारा छावणीचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे वरिष्ठ पत्र मिळाल्याचे तोंडी सांगितले. चारा छावण्याच्या बिलामुळे छावणीचालकांवर घरे, जमिनी गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. 

त्यामुळे येत्या दोन दिवसातमी व आमच्या चारा छावणी समितीच्या शिष्टमंडळाने आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंत्री ना. अनिल पाटील साहेब यांच्याकडून आणलेले पत्र घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली व सन २०१९ मधील चारा छावण्यांच्या बिलासंदर्भात चर्चा केली. 

यावेळी जिल्हाधिकारी यांनी चार दिवसात ठोस निर्णय घेऊ असे अश्वासन शिष्टमंडळाला दिले. परंतु चारा छावणीची बिले मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

- दिलीपराव सावंत, ता. अध्यक्ष, समन्वय समिती, सांगोला- मंगळवेढा

बिलाबाबत काही ठोस निर्णय न झाल्यास जनावरे तहसील कार्यालय आवारात सोडून चक्काजाम -आंदोलन करून सरकारी कामकाज बंद पाडू असा इशारा अध्यक्ष चारा छावणी समन्वयमा.आ. प्रशांतराव परिचालक यांनी आज चारा छावणी चालकांच्या आंदोलनाला भेट दिली.

 सर्व छावणीचालकांसमोर मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सन २०१९ मधील चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलासंदर्भात चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी लवकरच छावणीचालकांच्या प्रलंबित बिलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

समितीचे सांगोला- मंगळवेढा तालुका अध्यक्ष दिलीपाव सावंत यांनी दिला आहे. यावेळी समिती सदस्य शिवाजी देववकते, परमेश्वर सरगर, विष्णू मासाळ, शिवलिंग स्वामी, अरूण बिले, वसंत रूपनर, सोपान ठोंबरे, दादा जगताप, नामदेव जानकर, समाधान पवार, मारूती लवटे, आनंदा यमगर, पांडु देशमुख, विजय शिंदे, प्रशांत लवटे, आदी छावणीचालक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments