पीएमपीमध्ये दागिने चोरणाऱ्या सोलापूरच्या दोन महिला जेरबंद स्वारगेट
पोलिसांची कारवाई ः नऊ तोळ्यांचे दागिने जप्त, आठ गुन्हे उघड
पुणे, दि. 30 : पीएमपीतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या सोलापूरच्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
आरोपीकडून साडेसहा लाख रुपयांचे दागिने जप्त केले. करुणानिधी सिद्धराज जिनकेरी (वय २५), श्वेता उर्फ सरिता काशीनाथ पाटील (वय २४, दोघी सध्या रा. सोलापूर, मूळ रा. तारफेल, गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संदीप घुले, अनिस शेख गस्त घालत असताना दागिने चोरणाऱ्या दोन महिलांची सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना ताब्यात घेतले.
दोघींकडून नऊ तोळ्यांचे दागिने जप्त केले असून, आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. दागिन्यांची विक्री गुलबर्गा येथील एका सराफाला केल्याची महिती जिनकेरी आणि पाटील यांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड, फिरोज शेख, संजय पवार, मुकुंद तारु, दीपक खेंदाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.


0 Comments