आम्ही पाहिलेल्या महाराष्ट्रातील एक धाडसी आमदार: प्रणिती शिंदे...राजकुमार पवार सागोला
ज्या महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन असो अथवा, उन्हाळी अधिवेशन असो; त्या फक्त गोरगरीब, विद्यार्थी, महिला, युवावर्ग, वयोवृद्ध गटातील नागरिक यांच्यासाठी व, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपली बाजू मुद्देसूदपणे मांडतात.
१). सोलापूर शहरासाठी बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरु करावे.
२). सोलापूर जिल्ह्यातील युवकांसाठी तलाठी भरती परिक्षा लवकरात लवकर घ्यावी.
३). सोलापूरचा एक ज्वलंत असा प्रश्न: पाणी. शहरातील सर्व नागरिकांना एक दिवसाआड पाणी देण्यात यावे.
४). सोलापूर शहरासह महाराष्ट्र राज्याच्या रेल्वेच्या हद्दीतील अनेक झोपडपट्ट्या तात्काळ नियमित करण्यात याव्यात.
५). महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील अनुसूचित जाती-जमातीच्या मुलामुलींच्या वसतीगृहांची साफसफाई व, देखभाल करणाऱ्या क्रिस्टल कंपनीचा कारभार अतिशय वाईट असा आहे.
मुलामुलींना कोणत्याही सोईसुविधा पुरविल्या जात नाहीत, त्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. त्या कंपनीवर तात्काळ कारवाई करुन त्याठिकाणी दुसऱ्या नवीन कंपनीची नेमणूक करण्यात यावी.
६). सोलापूर शहरातील हातमाग-यंत्रमाग कामगारांसाठी एका कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी.
विकासासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये आवाज उठवणाऱ्या आणि, समाजातील सर्व वर्गांसाठी लढणाऱ्या एकमेव आमदार...
आम्ही कुणालाही नांवे ठेवत नाही. परंतु, आमदार प्रणिती शिंदे अशा आमदार आहेत; त्या फक्त गोरगरीब व, सर्वसामान्यांसाठी लढतात. आपला लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा याचे त्या एक अतिशय चांगले उदाहरण आहेत.
त्यांनी श्रावणबाळ योजना व, संजय गांधी निराधार योजना यांची मानधनाची रक्कम वाढवण्याकरीता आणि; उत्पन्नाचा दाखला ६० वर्षांपर्यंतच्या राज्यातील सर्व नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केले.
उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा २१ हजार रुपयांवरुन वाढवून ५१ हजार रुपये इतकी करावी* यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याला आमचा त्रिवार सलाम...
राजकुमार पवार सागोला


0 Comments