आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील मान्यवर मंडळी येणार
अधिवेशनानंतर तारीख निश्चित होईल प्रफुल्ल कदम यांची माहिती बहुचर्चित व महत्त्वपूर्ण पुरस्कार सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता
सांगोला प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)–स्वर्गीय आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती व संस्थांना आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्याचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण येणार असून
त्यांच्यासह राज्यातील इतर मान्यवर मंडळीही उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली आहे. येणाऱ्या अधिवेशनानंतर तारीख निश्चित होणार असून इतर मान्यवरांची नावेही निश्चित होणार आहेत अशी माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली.
आमदार डॉ. गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण हा सांगोला तालुक्यातील पहिला नामांकित व अत्यंत महत्त्वपूर्ण पुरस्कार असून याची चांगली चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये चालू आहे. त्यामुळे या पुरस्कार वितरण सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.


0 Comments