google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकप्रिय सेलिब्रिटी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते महिम येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमीपूजन संपन्न.

Breaking News

लोकप्रिय सेलिब्रिटी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते महिम येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमीपूजन संपन्न.

लोकप्रिय सेलिब्रिटी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते


महिम येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमीपूजन संपन्न.

सांगोला तालुक्यातील महिम येथे ₹१ कोटी ७७ लाख योजनेचे भूमीपूजन आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले …

याप्रसंगी गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते . महिम गावातील प्रत्येक नागरिकास प्रतिदिन प्रतिमाणशी ५५ लिटर शुध्द पाणी या योजनेतून उपलब्ध होणार असल्याचे सुरेश कमळे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सांगोला यांनी प्रास्ताविक करताना सांगितले…

सांगोला तालुक्यासाठी पाणी पुरवठा व इतर विकास कामासाठी एक रूपया सुध्दा निधी कमी पडू देणार नाही  असे आमदार शहाजीबापू यांनी या भूमीपूजन समारंभ प्रसंगी सांगितले .. 

महिम गाव व त्या अंतर्गत कांरडेवस्ती, लोखंडे मरगर वस्ती नारनवरवस्ती या वस्त्यांचा समावेश या योजनेत आहे. या व्यतिरिक्त इंगवलेवस्ती, चव्हाणवस्ती, चौगुलेवस्ती ,मरगरवस्ती ,व शिरगीरेवस्ती या वस्त्यांचा समावेश सुधारीत योजनेत करून योजना पूर्ण करा अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या… 

या प्रसंगी महिम गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य दादा लवटे, धनंजय काळे, संजय मेटकरी मक्तेदार धनाजी घाडगे व महिमचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments