प्रफुल्ल कदम यांची मोठी घोषणा :आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांच्या नावे सांगोला तालुका भूषण पुरस्कार जाहीर
डॉ. गणपतराव देशमुख सांगोला तालुका भूषण पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना जाहीर
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना देण्यात येणार पुरस्कार, पुरस्कार वितरण सोहळा होणार जंगी.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला तालुक्याचे माजी आमदार डॉ भाई गणपतराव देशमुख यांच्या दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या पहिल्या जयंतीचे औचित्य साधून जयंतीच्या पूर्व संध्येला सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि
संस्थाचा सन्मान डॉ गणपतराव देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्काराने करण्यात येणार आहे . सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, आणि सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना पहिला
डॉ.गणपतराव देशमुख सांगोला तालुका भूषण जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल भैय्या कदम यांनी दिली.
सांगोला तालुक्याचे माजी आमदार डॉ भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर आपल्या साध्या राहणीने आणि उच्च विचासरणीने पोहचविले आहे.
त्यांनी सांगोला तालुक्याला आणि पर्यायाने राज्याला घालून दिलेल्या आदर्शांची ठेवण नक्कीच संस्मरणीय आहे. त्यांच्या आठवणींचा आणि विचारांचा जागर सर्वत्र व्हावा,
या दृष्टीने सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाचा राज्यांतील नामवंत व्यक्तींच्या हस्ते भाई डॉ. गणपतराव देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास राज्यांतील आणि तालुक्यांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती ही या वेळी प्रफुल्ल कदम यांनी दिली.


0 Comments