google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे तालुक्यातील निम्माहुन अधिक भाग तहानलेलाच; झालेल्या पेरण्यांचीही चिंता सध्या दमदार पावसाची गरज- भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.विजय( बापू )बनसोडे

Breaking News

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे तालुक्यातील निम्माहुन अधिक भाग तहानलेलाच; झालेल्या पेरण्यांचीही चिंता सध्या दमदार पावसाची गरज- भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.विजय( बापू )बनसोडे

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे तालुक्यातील निम्माहुन अधिक भाग तहानलेलाच; झालेल्या पेरण्यांचीही चिंता सध्या दमदार पावसाची गरज-


भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.विजय( बापू )बनसोडे

सांगोला (प्रतिनिधी ) सांगोला तालुक्यात पावसाळ्याला सुरुवात होऊन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, तरीही सांगोला  तालुक्यात निम्म्या भागातील शेतजमीन तहानलेलीच आहे. 

परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शेतकरी बांधवांनी मे अखेरीस मशागत करून शेत पेरणीसाठी तयार करून ठेवले. पहिल्या तीनही नक्षत्रांत कमी प्रमाणात पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी या रिमझिम पावसावरच पेरणी केली.

 मात्र, नदी, ओढयाला एकही पूर आला नाही. झालेल्या पेरण्यांचीही चिंता वाढली आहे. मे च्या तापलेल्या उन्हाने शिलकीच्या पाण्यावर थोडा-फार हिरवा चारा केला होता, तोही आता संपला आहे. 

गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने जनावरांना घालण्यासाठी वैरण नाही.विहिरींचे व कूपनलिकांचे पाणीही वाढले नाही. चाऱ्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. 

आता मोठा पाऊस आला तरीही यंदा उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर दुभत्या जनावरांना हिरव्या चा-याची अडचण निर्माण झाली आहे. या चा-याचेही दर वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

सांगोला तालुक्यातील पहिल्या चारा छावणी चालकांचे बिल पेड करून नव्याने चारा छावणी चालू करून किंवा चारा डेपो चालू करावे अशी मागणी भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय( बापू) बनसोडे यांनी केली

Post a Comment

0 Comments