ब्रेकिंग न्यूज...पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा कारवाईचा
धडाका, अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाईची मोहीम उघडली. मटका घेणाऱ्या एजंटासह तब्बल 61 जणावर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच
जुगार अड्ड्यावर धाड टाकून 7 प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई करून रोख रक्कम ,8 दुचाकी,6 मोबाइल सह 5 लाख 26 हजार 840 रुपयाचा ऐवज हस्तगत केला या कारवाईने मंगळवेढ्यात खळबळ उडाली.
पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कारवाई ठरली असून मटका प्रकरणात मल्लेवाडी येथे मटका बुकीचालक सिध्देश्वर सलगर याच्या शेतातील एका खोलीत
कल्याण,मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा मंगळवेढा, जत,पंढरपूर,मोहोळ तालुक्यातील एजंटाला हाताशी धरून चालत
असल्याची माहिती पोलिस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला.यावेळी त्यांना तेथे मोबाईल ,प्रिंटर, संगणक, पेन,कागद व इतर जुगाराचे साहित्य मिळून आले.
अधिक चौकशी केली असता बुकीचालक हे मोबाईलवर आपले एजंटाकडून येणारे अंदाजे अंक आकडयावर मुंबई मटका नावाच्या जुगारावर पैशाची पैज लावून घेत असल्याची माहिती स्पष्ट झाली. यावेळी बुकीचालक सलगर याच्या मदतीला सुभाष घोगरे,महादेव ढेकळे,
बिभीषण सलगर,तानाजी मेटकरी,संभाजी ढेकळे,सुरेश हजारे असे घटनास्थळी मिळून आले.त्यांची झडती घेतली असता 15 हजार रुपये इतकी रोख रक्कम मिळून आली.तसेच काही मोटर सायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत.


0 Comments