गौप्यस्फोट:अजित पवार यांना उद्धव ठाकरे अन् काँग्रेससोबत जायचे नव्हते,
शिंदे गटातील शहाजीबापू पाटील यांचा दावा
महायुतीत आल्याने आता तिन्ही पक्ष अजित पवार यांचे झाले, असे मत शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
तर 'त्यांना' उद्धव ठाकरे अन् काँग्रेससोबत जायचेच नव्हते, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
दरम्यान शहाजीबापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत अजित पवार यांना जायचे नव्हते. ती त्यांची भूमिका होती.
पण, शरद पवारसाहेबांच्या हट्टामुळे आणि 3 दिवस समजूत घालून त्यांना परत आणले गेले. महाविका आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद अजितदादांनी निराशेतच स्वीकारले.
नेमके काय म्हणाले पाटील?
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, अजित पवार निधी देताना आमच्यावर अन्याय करतात, असा गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा सूर होता. त्यावेळी तो मी माध्यमांसमोर मांडला होता. त्यावेळी मी वैयक्तीक दुखणे कधीही मांडले नाही.
आता परिस्थिती बदलली आहे,महाविकास आघाडी सरकारमध्ये दादा रागाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. अजित पवार यांना ते आवडले असते तर त्यांनी पहाटे शपथविधी कशाला घेतला असता, असा उलटा सवालही त्यांनी केला.
सांगोल्यावर अजितदादांकडून अन्याय नाही
शहाजीबापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना मी अजित पवार यांच्यावर स्पष्टपणे बोललो. पण, त्यांनी माझ्या सांगोला मतदारसंघावर कुठेही अन्याय केलेला नाही. किंबहुना अजितदादांनी माझ्यासाठी थोडे ढळते माप दिले.
कारण मी पूर्वी 20 ते 25 वर्षे पवारांसोबत काम केले आहे. अजित पवारांसोबत आमचा व्यक्तीगत जिव्हाळा आहे. माझ्यावर ते खवळतात, पण अजित पवार यांचे माझ्यावर प्रेम आहे, असा दावाही पाटील यांनी केला.


0 Comments