google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंददाराआड नेमकं काय घडलं?

Breaking News

मोठी बातमी! अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंददाराआड नेमकं काय घडलं?

 मोठी बातमी! अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंददाराआड नेमकं काय घडलं?


राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांनची भेट घेतली.

तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. 

यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली.

राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली.

 त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

भाष्य करणं योग्य नाही

या आमदारांनी शरद पवार यांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू, असं जयंत पाटील म्हणाले. ते अचानक भेटले आहेत. 

त्यातून काय उद्देश आहे. हे आज सांगणं अवघड आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावं असं म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितलं. पण शरद पवार यांनी काही भाष्य केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आनंदच होईल

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर सर्व लोक एकत्र आले तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल, असं पाटील म्हणाले.

दावा करणार नाही

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबतही त्यांनी भाष्य केलं. आमची काँग्रेसशी चर्चा झाली आहे. ठाकरे गटाशीही चर्चा झाली आहे. आमच्याकडे संख्याबळ अधिक नसताना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं योग्य नाही.

कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. कारण सोडून गेलेल्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलेलं नाही. पण तरीही विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार नाही. आमच्याकडे सध्या 19 ते 20 आमदार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मंत्र्यांनी वारंवार विनंती केली, पण शरद पवारांनी प्रतिसाद दिली नाही

प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की…

आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांची वेळ न मागता आम्ही आलो. त्यांना भेटलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

आमच्या मनात पवार साहेबांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती त्यांना केली, असं प्रफुल्ल पटेल सांगितलं आहे.

शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आमची मतं जाणून घेतली. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

जयंत पाटील म्हणाले…

आज अजित पवार यांच्यासोबतचे आमदार पवार साहेबांना भेटायला आले. ही घटना अनपेक्षित घटना होती. याचा कधी विचार केला नव्हता. त्यामुळे यावर आताच भाष्य करणं संयुक्तिक वाटत नाही. 

सर्वजण बसल्यानंतर या भेटीवर चर्चा करू आणि पुढची दिशा ठरवू. या भेटीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments