google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील निधीच्या फाईली आता पुढे सरकतील काय ? अजित पवार अर्थमंत्री झाल्याने सांगोल्यात चर्चांना उधाण

Breaking News

सांगोला तालुक्यातील निधीच्या फाईली आता पुढे सरकतील काय ? अजित पवार अर्थमंत्री झाल्याने सांगोल्यात चर्चांना उधाण

सांगोला तालुक्यातील निधीच्या फाईली आता पुढे सरकतील काय ?


अजित पवार अर्थमंत्री झाल्याने सांगोल्यात चर्चांना उधाण

राज्यातील सध्याच्या राजकीय वादळानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत. पवार कुटुंबीय आणि आमदार शहाजी पाटील यांचे सख्य जगजाहीर आहे.

त्यातच अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. राज्यातील शिवसेना नेत्याप्रमाणे सांगोल्यातीलही निधीच्या फाईली आता पुढे सरकतील काय ? सांगोल्याला या अगोदरप्रमाणे भरघोस निधी मिळेल काय ? याबाबत नागरिकांमधून मोठी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

'काय झाडी, काय डोंगार'मुळे सांगेल्याचे आमदार शहाजी पाटील राज्यभर प्रसिद्ध झाले. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले आमदार शहाजी पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 

सांगोला तालुक्याच्या विविध कामांसाठी भरपूर निधी मिळाला असल्याचे अनेक वेळा आमदार पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. तालुक्यासाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांना निधीही मंजूर झाला होता.

निधी असो किंवा इतर अनेक प्रशासकीय कामे असोत सांगोला तालुक्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजी पाटील यांच्या निकट संबंधाचा मोठा फायदा झाला होता. तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प निधी मिळाल्यामुळे पुन्हा सुरू झाले आहेत.

निधीच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्याला मोठा हिस्सा मिळाला आहे. विविध प्रकारची कामे होऊ लागल्याने आमदार शहाजी बापूंचे कार्यालय नेहमीच गजबजलेले दिसू लागले होते. नवीन राजकीय समीकरणामुळे तालुक्याला कामांसाठी भरघोस निधी मिळेल का ? याबाबत नागरिकांमधून चर्चा सुरू झाली आहे.

पवार कुटुंबीय आणि शहाजी पाटील यांचे सख्य जगजाहीर -

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना अर्थमंत्री राहिलेले अजित पवार यांच्यामुळे आमचा मुख्यमंत्री असूनही आमच्या कमांच्या फाईली पुढे सरकत नव्हत्या. 

आम्हाला निधी मिळत नसल्याचे राज्यातील शिवसेनेच्या अनेक आमदारांबरोबरच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हेही परखड मत व्यक्त करत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर अनेक वेळा आमदार शहाजी पाटील यांनी पवार कुटुंबातील शरद पवार तसेच अजितं पवार यांच्यावर उघडपणे टीका केली होती. या टीका-टिप्पणीमुळे आमदार शहाजी पाटील व कुटुंबियांचे सख्य जगजाहीरच आहे.

पुन्हा तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच -

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड क्षमते न क्षमते तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. 

या भूकंपानंतर ते थेट विरोधी पक्षनेते पदावरून उपमुख्यमंत्री झाले. सध्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अर्थमंत्रालय मिळाल्याने त्यांच्याकडेच आलेल्या आहेत.

या नव्या खेळीमुळे शिवसेनेत बंडाच्या वेळी अर्थमंत्री असताना अजित पवार निधीसाठी कसा आकडता हात घेत होते हे उघडपणे सांगणारे आमदारांच्या कामांसाठी आता तरी निधी मिळणार का ?

 तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनीही अगोदर अजित पवारांवर टीका केल्याने पुन्हा सांगोल्याला भरघोस निधी मिळेल का याबाबत शहराबरोबर गाव कट्ट्यावरही याची चर्चा सुरू आहे.

बापूंना आता मंत्रालयात आबांचीही साथ -

राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे अजित पवारांच्या व्यासपीठावर आले होते.

 सध्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष भाजपबरोबर सत्तेत सामील झाले आहेत.

 आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे दोघे कोणत्याही पक्षात असले तरी विधानसभेपासून सर्वत्र एकत्रितच काम करीत होते.

परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे साळुंखे पाटील हे अजित पवार गटात सामील झाल्यामुळे आमदार शहाजी पाटलांना अधिक बळकटी मिळाली आहे.

 अजित पवार व आमदार शहाजी पाटील यांचे सख्य कसेही असले तरी अजित पवार गटात सामील झालेले दीपक साळुंके पाटील यांच्यामुळे तालुक्याबरोबर निधी मिळवण्यासाठी बापूंना मंत्रालयातही आबांची साथ निश्चितपणे मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments