google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार... सांगोल्यात स्मशानभूमीतील शव दाहिनी स्टॅन्ड चोरीला!

Breaking News

धक्कादायक प्रकार... सांगोल्यात स्मशानभूमीतील शव दाहिनी स्टॅन्ड चोरीला!

धक्कादायक प्रकार... सांगोल्यात


स्मशानभूमीतील शव दाहिनी स्टॅन्ड चोरीला! 

सांगोला; शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क : 

जुनोनी (ता. सांगोला) येथील स्थशानभूमीतील ६० हजार रुपये किमतीचे दाहीनी स्टॅन्ड अज्ञात चोरट्यांनी

 चोरून नेल्याची घटना घडली आहे. सांगोला पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ग्रामसेवक दादासो बाबा आडसुळ (वय ४७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुनोनी (ता. सांगोला) ग्रामपंचायती हद्दीतील स्मशानभुमीमधील शव दाहीनी स्टँड चोरीला गेले आहे. 

पंधराव्या वित्त आयोगामधून जुनोनी ग्रामपंचायतील मंजूर झालेल्या निधीतून मार्च २०२३ मध्ये हे शव दाहीनी स्टँड बसविण्यात आलेले होते. आज सकाळी 

(दि. १) ग्रामपंचायत लिपीक संजय वाघमारे यांनी हे शव दाहिनी स्टँड जागेवर नसल्याची माहिती ग्रामसेवकांना दिली. यानंतर ग्रामसेवकांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना शव दाहीनी स्टँडवरील बिडाचे कार्टिंग 

असलेल्या पट्ट्या व त्याचे नट बोल्ट काढुन नेल्याची आढळून आले. त्यानंतर साठ हजार रुपये किमतीच्या शव दाहीणी स्टँडमधील बिडाचे काटिंग असलेल्या पट्ट्या आज्ञात चोरी झाल्याचा सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments