google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना... मोबाइलसाठी मोठ्या भावाने धाकट्या भावाचा घोटला गळा

Breaking News

धक्कादायक घटना... मोबाइलसाठी मोठ्या भावाने धाकट्या भावाचा घोटला गळा

 धक्कादायक घटना... मोबाइलसाठी मोठ्या भावाने धाकट्या भावाचा घोटला गळा


 नांदेड मोबाइलकरिता एका २३ वर्षीय मोठ्या भावाने त्याच्या २० वर्षीय लहान भावाचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना २५ जून रोजी मध्यरात्री गोपाळचावडी येथे उघडकीस आली आहे.

सिडको वसाहतीच्या शेजारील गोपाळचावडी येथे वास्तव्यास असलेल्या अर्जुन राजू गवळे यांनी २५ जूनच्या रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास त्याचा मोठा भाऊ करण राजू गवळे याला मोबाइल मागितला.

 परंतु करणने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यावरून दोघा भावांमध्ये झटापट झाली. झटापटीत आरोपी करण गवळे याने अर्जुन गवळे याला ढकलून दिले.

 तसेच करणने अर्जुन गवळे याचा साडीने गळा आवळून खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मयत अर्जुन गवळे याचे मामा लक्ष्मणआई पुण्यात कामाला अर्जुन आणि करण या दोघांचेही पितृछत्र हरवले होते. आईच त्यांचा सांभाळ करीत होती.

 या दोघांची आई पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला आहे. तर हे दोघे जण नांदेडात भाड्याने खोली करून राहत होते. दोघेही मजुरीवर जात होते. परंतु मोबाइलवरून दोघांमध्ये वाद झाला.

मालोजी वाघमारे (रा. सिध्दार्थनगर, नांदेड) यांनी २६ जून रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व सपोनि.

 सुरेश थोरात व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोउपनि विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments