google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ... तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? भेटीनंतर कोमलताई म्हणाल्या...

Breaking News

मोठी बातमी ... तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? भेटीनंतर कोमलताई म्हणाल्या...

मोठी बातमी ... तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि


कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? भेटीनंतर कोमलताई म्हणाल्या... 

निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी असताना बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, माजी लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांनी आज सोलापुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी कोमल ढोबळे यांनी मोठी तयारी केल्याचे बोलले जात आहे.

त्यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केसीआर यांनी बीआरएसच्या वाढीसाठी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.

कोमल ढोबळे साळुंखे यांची प्रतिक्रिया 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आता केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यात मोठे स्थानिक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

कोमल साळुंखे-ढोबळेंची बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची होती चर्चा

केसीआर यांनी बीआरएसच्या वाढीसाठी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. 

आता केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यात मोठे स्थानिक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. कोमल ढोबळे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.

माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे साळुंखे यांनी आज के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. कोमल या सोलापूर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईलने एन्ट्री

सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला.

तसेच के.चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर केला गुलाब पुष्पांचा वर्षाव करतं त्यांचं स्वागत केलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे त्यांच्या सुमारे 400 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे.

त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय.

 केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते असतील. तेलंगणातून तब्बल 400 गाड्यांचा ताफा आज पंढरपुरात दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments