google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 साप्ताहिक समता नगरी वृत्तपत्राचे प्रकाशन सांगोला तहसीलदार संजय भगवान खडतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

Breaking News

साप्ताहिक समता नगरी वृत्तपत्राचे प्रकाशन सांगोला तहसीलदार संजय भगवान खडतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

 साप्ताहिक समता नगरी वृत्तपत्राचे प्रकाशन सांगोला तहसीलदार  संजय भगवान खडतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले


सांगोला (तालुका प्रतिनिधी) सांगोला तहसील कार्यालयाच्या तहसिलदार पदी संजय भगवान खडतरे यांनी  पदभार स्वीकारला  साप्ताहिक समता नगरी वृत्तपत्राचे प्रकाशन दि.९ जुनं रोजी सांगोला नूतन तहसीलदार संजय खडतरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले 

यांचेसह माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस , साप्ताहिक,समता नगरी संपादक संतोष साठे, सांगोला प्रहार संपादक उमेश मंडले सामाजिक नेते शंकर बापू गायकवाड विजय सुरवसे घोंगडे सर लिगाडे सर  पियुष पाटील मंगल ताई खाडे जयश्री पाटील तालुका उपाध्यक्ष    शुभांगी पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी पार्टी उपस्थित होते.

नूतन तहसिलदार संजय खडतरे यांनी सांगोला,पंढरपूर,मंगळवेढा, मोहोळ, ऊ. सोलापूर, येथे महसूल क्लार्क म्हणून उत्कृष्ठ काम केले आहे 2016 साली त्यांची मावळ जि. पुणे येथे प्रांत कार्यालय येथे नायब तहसिलदार म्हणून पदोन्नती झाली

 त्याठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची सांगोला येथे पदोन्नतीवर तहसिलदार म्हणून नेमणूक झाली आहे त्यानी  सोमवार रोजी सांगोला तहसिलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. 

तसेच साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस व समता नगरी संपादक श्री संतोष लक्ष्‍मण साठे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments