google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ७ वर्ष झाली उपकेंद्रास डॉक्टर मिळेना ना कर्मचारी; तालुका वैद्यकीय अधिकारी यांना गांभीर्य नाही

Breaking News

सांगोला ७ वर्ष झाली उपकेंद्रास डॉक्टर मिळेना ना कर्मचारी; तालुका वैद्यकीय अधिकारी यांना गांभीर्य नाही

सांगोला ७ वर्ष झाली उपकेंद्रास डॉक्टर मिळेना ना कर्मचारी; तालुका वैद्यकीय अधिकारी यांना गांभीर्य नाही


हलदहिवडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बनले गावातील शोभेची वस्तू

सांगोला हलदहिवडी व परिसरातील रुग्णांना गावातच प्राथमिक उपचार मिळावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र निधी सन २०१६- १७ मधून रुग्णांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार्या इमारती बांधून गेली कित्येक वर्ष पूर्ण झाल्या आहेत. मात्र शासनस्तरावरुन या आरोग्य उपकेंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचायांच्या नियुक्त्या न 

केल्यामुळे सध्या या रंगरंगोटी केलेल्या इमारती गावातील शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. शासनाने तात्काळ या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठीवैद्यकीय अधिकारी- कर्मचायांची नेमणूक करुन गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरु करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गोरगरीब, नागरिक, अंध, अपंगांना नाममात्र शुल्क भरून वैद्यकीय सेवा मिळावी यासंकल्पनेतून हलदहिवडी येथे ८४ लाख रु. खर्चून सर्व सुविधा उपलब्ध असणारी इमारत बांधून पुर्ण झाली आहे.

 तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडून या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची पदे नियुक्त करणेकामी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.परंतु वर्षा न वर्ष उलटुन गेली

मात्र कर्मचारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यावर शासनाकडून अद्याप प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सध्या या इमारती बांधून पूर्ण असल्या तरी नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार आहे.

 हे सांगणे कठीण आहे.हलदहिवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी इमारती बांधून पूर्ण आहेत. लाखो रुपये खर्च करून बांधकाम केले मात्र आज इमारत जीन नादुरुस्त होत आल्यातरी उद्घाटनाचा मुहूर्त मिळेनासा झाला आहे.

 तालुका वैद्यकीय अधिकारी यांना याचे गांभीर्य नाही. तर नागरिक उपकेंद्रात उपचार मिळेल या आशेवर आहेत. याबाबत आरोग्य मंत्री मा. ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देवून ह. दहिवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करावे.

हलदहिवडी ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments