google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे चोरलेल्या चार आरोपींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Breaking News

सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे चोरलेल्या चार आरोपींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील  बंधाऱ्याचे


दरवाजे चोरलेल्या चार आरोपींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सांगोला / शब्दरेखा एक्सप्रेस न्युज नेटवर्क :             सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील बंधाऱ्याची दरवाजे चोरल्याप्रकरणी चार आरोपींना सांगोला पोलीसांनी अटक केली आहे

याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील अज्ञात चोरट्याने बंधाऱ्यांची दोन लाख नऊ हजार किमतीचे 102 दरवाजे चोरीस गेल्याची फिर्याद पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी शैलेशकुमार सुखदेव पवार रा/ ता. पंढरपूर जि सोलापूर यांनी दिली होती दिलेल्या फिर्यादीनुसार 

सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाढेगाव येथील तानाजी उर्फ बंडू बापू चौगुले वय 35 वर्षे सिद्धेश्वर राजाराम लेंडवे वय 26 वर्ष श्रीकांत उर्फ माऊली सुभाष पवार वय 33 वर्षे आणि 

दत्तात्रय उर्फ पिंटू सुभाष पवार वय 30 वर्ष सर्वजण राहणार वाढेगाव तालुका सांगोला वरील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या चार आरोपींना दोन दिवसाची पोलिस कस्टडी मिळाली होती अधिक तपास सांगोला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार संजय बगाडे करीत आहेत

" ग्रामपंचायत सदस्यच निघाला चोर

वाढेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य तानाजी उर्फ बंडू बापू चौगुले हा विद्यमान ग्रामपंचायत असून बंधाऱ्याच्या दरवाजाची चोरी केली असल्याने सांगोला पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे "

Post a Comment

0 Comments