सांगोला शहरातील अतिक्रमण हटवले चिंचोली रोडवरील डाळिंब व्यापाऱ्यांवर मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन कारवाई करणार का ?
सांगोला : सांगोला शहर व उपनगरातील अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यवसायिकांचे उद्योगधंदे द व्यवसायावर मुख्याधिकारी यांनी कडक कारवाई केली. परंतु मुख्याधिकारी यांनी शहरातील अतिक्रमण हटवले पण चिंचोली
रोडवरील डाळिंब व्यापान्यांवर मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सांगोला तालुका हा डाळिंब व्यवसायासाठी संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे परंतु गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये सांगोला तालुक्यातील डाळिंब भागावर आलेल्या रोगामुळे अनेक डाळिंबाला उध्वस्त झाल्या
त्यामुळे मार्केट यारडामध्ये बाहेरून आलेले व्यापारी उद्योग व्यवसाय करत होते.परंतु डाळिंबाची आवक कमी झाल्याने या व्यापान्यांना व्यापार करणे अवघड झाले.
डाळिंब व्यापार करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी चिंचोली रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपला बाजार मांडला आहे. त्यामुळे या रस्त्याला पुण्या मुंबईचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे
या रोडवर या व्यापाऱ्याने केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यावर चक्काजाम झाल्याचे चित्र सध्या चिंचोली रोडवर पहायला मिळत आहे.
या व्यापाऱ्यांनी आपला बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजूला मांडला असल्याने या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या महिला, मुली, शालेय विद्यार्थी,
विद्यार्थिनी यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सांगोला ही एक मोठी बाजारपेठ असून चिंचोली, धायटी, शिरभावी या गावाहून अनेक
नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच कामानिमित्त रोज सांगोला येथे करत असतात. परंतु या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी चक्काजाम केल्याने या नागरिकांना
आपले वाहन चालवत असताना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या अतिक्रमणामुळे या रोडवर अनेक छोटे मोठे अपघात पडले आहेत.
ताबडतोब मुख्याधिकारी यांनी या व्यापायांवर कारवाई केली नाही तर अजूनही अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे असे अपघात व नागरिकांना होणारा त्रास याचे गांभीर्य मुख्याधिकारी यांनी लक्षात घेऊन, ज्याप्रमाणे मुख्याधिकारी यांनी शहरातील अतिक्रमणे हटवले.
त्याचप्रमाणे मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन या व्यापायांवर कोणती कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


0 Comments