पोस्टल असिस्टंट पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
पंढरपूर मुख्य डाक कार्यालय अंतर्गत मंगळवेढा उपमुख्य कार्यालय अंतर्गत जमादार (मेल ओव्हरसीएल) या पदावरती काम करत असणारे श्री राम कुलकर्णी यांची श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे पदोन्नती झाली.
या पदोन्नती निमित्त मंगळवेढा उपमुख्य कार्यालय अंतर्गत असणाऱ्या महूद सब पोस्ट कार्यालयात कार्यालयाचे मुख्य श्री हनुमंत निंबाळकर व ज्येष्ठ बी पी एम श्री चंद्रशेखर गाडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पदोन्नती झालेले श्रीराम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी महूद कार्यालयांतर्गत असणाऱ्या सब ऑफिस व सर्व बीओचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री विकास पवार यांनी केले. उपस्थित यांचे आभार श्री संजय राक्षे यांनी मांडले.
0 Comments