google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक... सासरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

Breaking News

धक्कादायक... सासरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

धक्कादायक.....सासरवाडीत बायकोसोबत

शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात ही घटना घडली आहे. 

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज काळभोर (वय २८) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या घटनेची माहिती मिळताच, तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज काळभोर याचा गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्याभरापूर्वी लग्न झाले होते. सूरज हा आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल परिसरात राहात होता. त्याची आई ही महापालिकेच्या दवाखान्यात कामाला आहे. 

तर सूरज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करत होता. त्याला वडील नसून तो आई आणि पत्नीसोबत तो राहात होता. मात्र, अचानक झालेल्या घटनेनं आई आणि पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments