google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कलबुर्गी -कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा नाहीच सांगोला स्थानकावरील प्रवाशांच्या व्यथा: रेल्वे बोर्डाने तोंडाला पुसली पाने सांगोल्यात दोन रेल्वे गाड्यांमध्ये 14 तासांचे अंतर

Breaking News

कलबुर्गी -कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा नाहीच सांगोला स्थानकावरील प्रवाशांच्या व्यथा: रेल्वे बोर्डाने तोंडाला पुसली पाने सांगोल्यात दोन रेल्वे गाड्यांमध्ये 14 तासांचे अंतर

 कलबुर्गी -कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा नाहीच सांगोला स्थानकावरील प्रवाशांच्या व्यथा: रेल्वे बोर्डाने तोंडाला पुसली पाने सांगोल्यात दोन रेल्वे गाड्यांमध्ये 14 तासांचे अंतर


सांगोला( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

रेल्वेचे  विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊनही सांगोला रेल्वे स्टेशनवर 22155 & 22156 कोल्हापूर- कलबुर्गी -कोल्हापूर एक्सप्रेसला थांबा मिळत नसल्याने प्रवाशांना गैरसोयी सहन करावी लागत आहे  .याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने अनेक वेळा आंदोलने ,मोर्चाही काढला .

  खासदार रणजीतसिंह  निंबाळकर ,रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा सांगोलकरांच्या तोंडाला पाने पुसले आहेत त्यामुळे रेल्वे स्टेशन आता असून अडचण आणि नसून खोळांबा झालेले आहे.

सोलापूर रेल्वे विभागातील सांगोला रेल्वे स्टेशन पंढरपूर नंतर सगळ्यात जास्त उत्पन्न देणारे आणि दळणवळणात सोयीस्कर असलेल्या सांगोला रेल्वे स्टेशनवर ना गाड्यांना थांबा मिळत आहे 

ना रेल्वे बोर्ड सांगोलकरांच्या अडचणी समजून घेत आहे .आटपाडी ,जत ,मंगळवेढा ,माळशिरस असे चार तालुके जोडलेले आहेत या तालुक्यांसाठी सांगोला हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे  परंतु मोजक्याच गाड्या सांगोला रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे,

 सांगोलमधून परळीला  जाण्यासाठी रात्री 10:45 वाजता रेल्वे आहे सदर गाडी कोरोना कालावधीनंतर ऑक्टोबर2022 पासून धावत आहे पण पूर्वी ही गाडी पॅसेंजर होती आता ती सध्या सुपरफास्ट डेमो या नावाने धावत आहे, तिकीट दरही वाढवला आहे 

या गाडीची रेक बदलून ती डेमो करण्यात आली आहे एवढ्या लांबच्या पल्यात प्रवासात रेल्वे प्रशासनाने चुकीचा रेक वापरला आहे त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल, गैरसोय होत आहे सदरचा प्रवास पूर्णपणे रात्रीचा असल्याने प्रवाशांच्या जीवितास  धोका आहे , 

रेल्वे प्रशासनाने मिरज -परळी करता स्लीपर व इतर डबे पूर्ववत प्रमाणे ठेवावे. सांगोला रेल्वे स्टेशनवर फक्त नागपूर ,धनबाद, यशवंतपूर एक्सप्रेस तर मिरज -कुर्डवाडी परळी- मिरज एवढ्याच गाड्यांना थांबा आहे रेल्वे स्टेशनवर आणखी गाड्यांना थांबण्यासाठी विनंती केली होती 

आता गाड्या थांबाव्यात यासाठी कित्येक निवेदन दिली यानंतर सप्टेंबर 2022व नोव्हेंबर, जानेवारी 2023 मध्ये सांगोला रेल्वे स्टेशनवर मोठा मोर्चा काढण्यात आला होता तरीही रेल्वे प्रशासन उदासीन दिसत आहे.

चौकट* दोन रेल्वे गाड्यांमध्ये 14 तासांचे अंतर*

सध्या सांगोल्यातून पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर पुणे या ठिकाणी जायचे झाले तर सकाळी 08 वाजून 30 मिनिटांनी मिरज- कुर्डूवाडी डेमो आहे

 त्यानंतर सायंकाळी 10.45 च्या सुमारासच मिरज- परळी रेल्वे आहे म्हणजे जवळजवळ 14 तासांचे अंतर या दोन गाड्यांमध्ये आहे या व्यतिरिक्त इतर कोणतीही रेल्वेगाडी दिवसभरात नाही व सांगोल्यात कलबुर्गी रेल्वे गाडीचा थांबा नसल्याने येथील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

त्यामुळे सांगोलकरांच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत याला पर्याय म्हणून सकाळी 11 ते  1 च्या सुमारास कोल्हापूर- सोलापूर इंटरसिटी कोल्हापूर येथून सुरू करावी व कोल्हापूर- कलबुर्गी रेल्वेस सांगोल्यात तात्काळ थांबा मिळावा या मागणीचे पत्र संघटनेने रेल्वे विभाग सोलापूर यांना दिले आहे.

निळकंठ शिंदे सर ,संस्थापक :-शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला.

Post a Comment

0 Comments