कौतुकास्पद - यंदा चा राज्यस्तरीय राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कर निर्भीड संपादक चाँदभैय्या शेख यांना जाहीर
सांगोला - तालुका प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य, तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी,
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे व गेल्या सतरा वर्षांपासून पत्रकारिता , सामाजिक ,राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे
सीबीएस न्युज मराठी नेटवर्क चे संपादक व निर्भीड पत्रकार चाँदभैया शेख यांना धम्म भवन चँरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दिला
जाणारा राज्यस्तरीय *राजर्षी शाहू प्रेरणा*"पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा सोहळा रविवार दि.18जुन रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे .
कवी जसा जन्मावा लागतो. तसा पत्रकार आकाराला यावा लागतो. कवी आपल्या कवितेत कल्पनेने रंग भरतो.
पण पत्रकाराला तसं बातमीमध्ये कल्पनेचं झालर लावता येत नाही. पत्रकाराला स्वतः बातमीत उतरावं लागतं.
पत्रकार हा धक्का धक्कीचे साहित्य निर्माण करणारा वास्तववादी साहित्यिकच असतो. निःपक्ष व निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी समाजावर, गोरगरिबांवर,
स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. याची जाणीव चाँदभैय्या शेख यांना झाली.
चाँदभैय्या शेख यांनी अनेक संघटनामध्ये स्वःताला झोकून देऊन काम केले आहे. प्रत्येक संघटनेत आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
राजकीय क्षेत्रात हि त्यांनी चार वर्षे सांगोला तालुका अल्पसंख्याक काँग्रेस तालूका अध्यक्ष म्हणून काम करताना
सर्वसामान्य गोरगरीबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निर्भीड विचारधारा असल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे .
अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे.
तसेच लेखन ज्ञान, ध्येयवाद, अभ्यासू, सत्यनिष्ठ, निर्भीडता, जिज्ञासावृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, चारित्र्य संपन्न व प्रेरणादायी असे
गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी दिसून येतात.सांगोला सारख्या उजाड माळरान भागात ज्या काही घटना घडामोडी घडतात
त्या दिवस भराच्या घडामोडी संकलन करून एवढ्या वरच गप्प न बसता, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय,
कृषी कार्यालय यासह इतर प्रशासकीय कार्यालयात, जनतेच्या आलेल्या तक्रारी संदर्भात, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बोलून तक्रारीचे,
अडचणीचे निवारण करतात. सत्य शोधण्यासाठी बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार म्हणून चाँदभैय्या यांची ख्याती आहे.
अन्यायाविरुद्ध झुंज देणारा झुंजार पत्रकार असे त्यांना संबोधण्यात येते. कोविड काळात पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती केली.
याची दखल प्रशासनाने घेतली. विशेषतः ते जवळजवळ विविध संस्थेच्या माध्यमातून २३४ वेळा कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
तर त्यांना पत्रकारिता ,सामाजिक क्षेत्रात आतापर्यंत ९१ वेळा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .तर हा पुरस्कार त्यांचा ९२ वा असल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे .


0 Comments