google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या प्राचार्यपदी श्रीकांत लांडगे यांची निवड

Breaking News

कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या प्राचार्यपदी श्रीकांत लांडगे यांची निवड

 कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या प्राचार्यपदी श्रीकांत लांडगे यांची निवड


कोळा (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी श्रीकांत लांडगे यांची निवड झाली आहे. 

त्यांनी 28 जुलै 1992 पासून आज पर्यंत कोळा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून 31 वर्षे इयत्ता दहावीला इंग्रजी विषयाचे अतिशय उत्कृष्ट अध्यापन केले आहे 

व आपल्या इतर शैक्षणिक कार्यातून वेगळा ठसा कोळा पंचक्रोशीमध्ये उमटवला आहे. त्यांना 2017 चा सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा /मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. 

त्याचबरोबर सांगोला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेत संचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय व अधिकारी पदावर कार्यरत आहेत नूतन प्राचार्य श्रीकांत लांडगे यांनी मावळते प्राचार्य नारायण विसापुरे यांच्या हस्ते पदभार घेतला.

 यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी संस्था सचिव म. शं. घोंगडे, नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक बिभीषण माने व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यानिमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके व सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, पर्यवेक्षक रफिक मणेरी,

 इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक विनोद देशमुख व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन प्राचार्य श्रीकांत लांडगे यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments