प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिरभावी :- विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असलेले सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे सुपुत्र व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक तसेच श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे
संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांना Asia international Culture Research University, Asia international Culture Academy या मान्यताप्राप्त विद्यापीठाची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली .
तामिळनाडू मधील होसुर येथील Claresta international hotel मधील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टरेट पदवी प्रदान चा शानदार सोहळा झाला. यावेळी विद्यापीठाचे प्रमुख विश्वस्त तसेच मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात Dr. K.A. MANOKARAN EX. MLA TAMILNADU WORKING PRESIDENT – INTUC (Indian National Trade Union Congress),Dr.J. HARIDOSS MBA.,BL Rted (Asst. JUDGE A.P.),Mr. ARUNKUMAR
HR.Deputy Director. Social welfare Department. Govt of Karnataka,BJ REKHA JAYOPPA Karnataka Manava Hakkugala Jana Seva Samsthe Mahila raajya – President-adyakshar,Dr. GUNAVANTHA MANJU Kannada Film Director And Writer.
President Athmasree Kannada Samskruthika Pratistana,VIDHUSHI SMT. MANJU BHARGAVI B.K Nadantha Natya Mayuri School Of Dance. KUSHALNAGAR – Madikeri District. Karnataka,Dr.Vikram Shingade,Adv.Priti Koli
आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पदवीप्रदान सोहळा पार पडला . या दरम्यान या समारंभात प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांना मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविले आहेत . ते सध्या श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठान या मार्फत ही शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहेत.
तसेच ते शैक्षणिक, सामाजिक, सहकार,पत्रकारिता व इतर क्षेत्रांमध्ये आपला अग्रणी सहभाग दाखवून कार्य करत आहेत . गेल्या काही वर्षांपासून ते आदर्शवत कार्य करत आहेत. लोकसेवेसाठी ते नेहमी तयार असतात . त्यांनी त्यांच्या कार्याचा नवा आदर्श नवीन पिढी समोर ठेवला आहे.
त्यांची विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व कर्तृत्व पाहून त्यांना Asia international Culture Research University, Asia international Culture Academy या मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलाणीवस्ती येथे तर माध्यमिक शिक्षण श्री . सिताराम महाराज विद्यालय खर्डी येथे तर ११ व १२ वी चे शिक्षण सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे तर डी.एल.एड चे शिक्षण श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालय सांगोला येथे तर बी .ए . लोकमान्य टिळक मुक्त विद्यापीठातून झाले आहे .
तर डी.एस.एम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून झाले आहे . तर एम .ए. स्वामी विवेकानंद सुभारती यूनिवर्सिटी मधून झाले आहे . तर सी.टी.सी. अभिनव हस्तकला व कार्यानुभव अध्यापक विद्यालय सांगोला येथे झाले आहे . प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना आई ताई घोरपडे , वडील दत्तात्रय घोरपडे ,
भाऊ नवनाथ घोरपडे , बहीण रेश्मा दिघे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वाघमारे सर, गायकवाड सर, देशपांडे सर, सी . बी . रोंगे सर, आप्पा रोंगे सर, एन . डी . बंडगर सर, आनंदा आलदर सर, भारत पाटील सर, कुलकर्णी सर, पवार सर, राकेश पवार, इनामदार सर,
लट्ठे सर, दिघे मॅडम, कुरणे मॅडम, गाडे मॅडम, चव्हाण मॅडम, पाटोळे मॅडम, सय्यद मॅडम, मोरे मॅडम, पोरे मॅडम, गेजगे मॅडम, ढोले मॅडम व चुलते धनंजय घोरपडे सर, संतोष घोरपडे सर, विष्णु घोरपडे, रामचंद्र घोरपडे, नामदेव घोरपडे, सिताराम घोरपडे तसेच काकू
प्रा. विद्या घोरपडे , प्रियांका घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तामिळनाडू मधील होसुर येथे संपन्न झालेल्या पदवीप्रदान समारंभात प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांना डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. याबद्दल प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


0 Comments