धक्कादायक... मंगळवेढ्यातील 'या:
कालव्याच्या पुलाखाली आढळला अनोळखी मृतदेह;पोलिसांनी केले आवाहन...
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव ते तनाळी रस्त्यावर माण नदीच्या पुलाखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याची अद्याप ओळख पटली नाही.
मृतदेह सोमवारी आढळला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत माहिती अशी, गुंजेगाव-तनाळी रस्त्यावर उजनी कॅनॉलच्या पुलाखालीएक अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती गुंजेगावचे पोलिस पाटील यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी सदर ठिकाणी ५० ते ५५ वर्षे अंदाजे वय असणारे, गोल चेहरा, बसके नाक, डोक्यावर काळे पांढरे केस, मध्यम मिशी,अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर बारीक निळ्या रंगाचे ठिपके असलेला शर्ट असलेला अनोळखी मृतदेह आढळला. तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे करीत आहेत.


0 Comments