आश्चर्याचा धक्का.. बॅंकेतच महिलेच्या अंगात आली देवी? सरकारला दिला शाप....
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या मध्य प्रदेशातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बॅंकेत उड्या मारत नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काही लोकांनी महिलेच्या अंगात देवी आल्याचा दावा केला आहे.
शुक्रवारी गुना जिल्ह्यातील एका बॅंकेमध्ये लाडली बहना योजनेसाठी एक महिला आधार लिंक करण्यासाठी गेली होती. यावेळी ती अचानक विचित्र पद्धतीने उड्या मारायला लागली.
शिवाय तिने आपले केस मोकळे सोडून नाचायला सुरुवात केली. महिलेने विचित्र डान्स करायला सुरुवात करताच बॅंकेतील अधिकाऱ्यांसह तिथे उपस्थित महिला घाबरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काही लोकांनी या महिलेच्या अंगात देवी आली होती,
असा दावा केला आहे. या विचित्र घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लाडली बहना योजनेसाठी केवायसी करण्यासाठी महिला बॅंकेत गेली होती. यावेळी अनेक महिला रांगेत उभ्या होत्या.
यावेळी सदर महिला अचानक विचित्र हावभाव करत, केस मोकळे सोडून उड्या मारायला लागली. ती एवढ्या जोरात नाचत होती की, तिला बघून लोक तिच्या अंगात देवी आली असल्याचं म्हणू लागले. व्हायरल होत
असलेल्या व्हिडीओमधील महिला रांगेतून बाहेर येते आणि नाचायला सुरुवात करते, यावेळी ती मोठमोठ्याने काहीतरी बोलताना दिसत आहे. यावेळी ती नाचता नाचता अचानक खाली पडते आणि जमिनीवर हातपाय सुरुवात करते


0 Comments