सहकारी सोसायटीच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)
पक्षाच्या वतीने महूद विकास सोसायटीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार
महूद, ता. ८ : महूद येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.
या मागणीसाठी सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या वतीने महूद विकास सोसायटीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या वतीने सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक,सांगोला यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे
की,महूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व सचिव यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी.
अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना या विकास संस्थेचे सभासद करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
महूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने महूद येथे उभारण्यात आलेल्या व्यापारीसंकुला मधील गाळे ठराविक लोकांनाच देण्यात आले आहेत.
या गाळ्यांचा फेर लिलाव करण्यात यावा.या लिलावामध्ये अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांसाठी राखीव गाळे ठेवण्यात यावेत.
या मागणीसाठी सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाच्या वतीने गुरुवार
(ता.१५) रोजी महूद येथील विकास संस्थेच्या कार्यालयावर सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.हे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे
तालुकाध्यक्ष खंडू सातपुते,सरचिटणीस सुरज होवाळ,युवकचे जिल्हाध्यक्ष नवनाथ सरतापे,बाबा सरतापे,महूद शहराध्यक्ष विशाल सरतापे,
युवक तालुकाध्यक्ष सौदागर सावंत,विनोद उबाळे,स्वप्निल सावंत,दिगंबर गवळी, संजय करडे,दिगंबर सरतापे यांनी सांगोल्याचे तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांनाही दिले आहे.


0 Comments