google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार दहा हजार; प्रस्ताव पाठविण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार दहा हजार; प्रस्ताव पाठविण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

 सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या


बालकांना मिळणार दहा हजार; प्रस्ताव पाठविण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोरोना प्रादुर्भावाने आई अथवा वडील किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी 

दहा हजार रुपयांचा बालनिधी मिळणार आहे. याकरीता प्रस्ताव पाठविण्यास ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति 

बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार असून,

३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक

लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ता. ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. 

मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

लाभार्थीना प्रस्ताव सादर करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना ७२१९१०४५०३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments