google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गोलरींगण सोहळा संपन्न.

Breaking News

कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गोलरींगण सोहळा संपन्न.

 कोळा विद्या मंदिर इंग्लिश  मिडीयम स्कूल मध्ये गोलरींगण सोहळा संपन्न.


कोळा :-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गोलरींगण सोहळा संपन्न.

   या कार्यक्रमची सुरवात पालखी व विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमाचे पूजन ह. भ. प. जवळेकर महाराज, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, मुख्याध्यापक व्ही. व्ही.देशमुख सर, पर्यवेक्षक  र. ज. मनेरी सर, सहशिक्षक जे. पी. माने सर, यांच्या शुभ हस्ते झाले.

    आषाढी एकादशी निमित्त कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलांनी माऊली माऊली, विठू माऊली च्या जयघोषात मुलांनी गोलरींगन व पावली खेळली, 

तसेच यावेळी ह. भ. प. महाराज जवळेकर यांनी मुलांना भविष्यात आपण काय बनायचे, मोठया व्यक्तीशी कसे वागावे, अभ्यास नेहमी करायचा, मोठे व्हायचे याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.

    या सोहळ्यासाठी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुले वारकरी वेषभुषेत आले होते.

      सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी विभाग प्रमुख ए. बी. माळी मॅडम यांच्या सह विद्या मंदिर परिवार मधील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments