google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिंचोली रोडवरील चारमिनार फायर वर्क्स जवळ ८ दिवसात दुसरा अपघात ; चिंचोली येथील युवक ठार ;

Breaking News

चिंचोली रोडवरील चारमिनार फायर वर्क्स जवळ ८ दिवसात दुसरा अपघात ; चिंचोली येथील युवक ठार ;

 चिंचोली रोडवरील चारमिनार फायर वर्क्स जवळ ८ दिवसात दुसरा अपघात ; चिंचोली येथील युवक ठार ; 


निष्काळजीपणे पाईप लाईनचे खोदकाम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

सांगोला तालुका प्रतिनिधी ; सांगोला ते चिंचोली रोडवर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून 

चिंचोली रोडवरील चारमिनार फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखाना समोर नवीन पाईपलाईन 

टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेने चारी खोदून त्या चारी मधील निघालेला मुरूम भर रस्त्यात टाकल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत.

दि.२३ जून रोजी या ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या मुरुमाचा अंदाज न आल्याने एका कारचा अपघात झाला होता. 

त्या कार मधील एक ११ वर्षांचा मुलगा मयत झाला होता. आणि दोन जण जखमी झाले होते. 

पुन्हा दि.२८ जून रोजी याच ठिकाणी भर रस्त्यावर टाकलेल्या मुरुमाचा अंदाज न आल्याने मुरुमावर दुचाकी आदळून चिंचोली येथील युवकाचा मृत्यू झाला आहे.

रस्त्याच्या कडेला पाईपलाईन साठी चारी खोदत असताना ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक लावले नाहीत किंवा त्या ठिकाणी

 रात्री वहाने चालवणाऱ्या चालकांना दिसेल अश्या प्रकारचे लाल रेडियमचे सावधान असे सुचना फलक लावले नाहीत.

 त्यामुळे या ठिकाणी अपघात होवून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर शासकीय कामात 

निष्काळजीपणा केले प्रकरणी  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments