जनतेचा नेता डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या कार्यास सलाम....
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
*सांगोला तालुक्यातील एका गुणवंत मुलीचा सन्मान करून डॉ बाबासाहेब देशमुख रात्रीच्या वेळेस घरी परत असताना .सांगोला शहरापासून काही अंतरावर सांगोला मिरज रोडवर एक महिला
सायकलवरून रात्रीच्या वेळेस वारकरी पंतांचा झेंडा व तिरंगा ध्वज लावून सांगोलच्या दिशेने जात असताना .गाडीतून दिसल्या वेळ रात्री ११ ची एक महिला सायकलवरुन जातेय काय ध्येय आहे .या महिलेचं हे विचारण्या करिता गाडी थांबऊन विचारणा केली
असता .त्या महिला कोल्हापूर वरून पंढरपूरला सायकल वारी विठठल माऊलींच्या दर्शना साठी निघाल्या होत्या, त्यांच्या बरोबर कोल्हापूर भागातील आठ ते नऊजण वय वर्ष पन्नास ते पंचावन्न या वयाची लोक सायकल वरून दर्शनासाठी निघाले होते
.कोण पुढे होत कोण पाठी माघे होत, साहेबांनी त्याना तुम्ही आता रात्रीच्या वेळेस कुठे थांबणार तर त्या महिलेने उत्तर दिले कि सांगोल्यात कोणत्यातरी हॉटेलवर थांबणार. असे सांगितले मग साहेबांनी क्षणाचाही विलंब नकरता माणुसकीचा धर्म म्हणून कोण कुठले
हे लोक आपल्या जिल्हातील नाही ,आपल्या तालुक्यातील नाहीत, मी कशी मदत करू साहेबांनी एक फोन केला आणि सांगोला सूतगिरणीवर त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची सोयकरून त्या लोकांना एक आपुलकीचा आधार दिला
व कोल्हापूच्या लोकांनी बाबासाहेबांचे आभार मानले .खरतर *स्वर्गीय मा आ डॉ भाई गणपतराव देशमुखयांचे संस्कार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यावर आहेत हे दिसून आले बाबासाहेब देशमुख कधी मताच्या राजकारणासाठी मदत करत नाही ,
तर आबासाहेबांच्या विचार पुढे घेऊन आपण जनमानसाची सेवा करायची हे ध्येय उराशी बाळगून समाजकारण कसे करता येईल हे दिसून आले या गोष्ठीतून असेच मदत कार्य चालू राहणार डॉ बाबासाहेब हेच आमचे आबासाहेब माणूस आपल्या हक्कांचा आपल्या कार्यास सलाम* !!!


0 Comments