google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...पती बाहेर बोलत असताना कारला आग ;पत्नी जळून खाक

Breaking News

धक्कादायक ...पती बाहेर बोलत असताना कारला आग ;पत्नी जळून खाक

धक्कादायक ...पती बाहेर बोलत असताना कारला आग ;पत्नी जळून खाक


मंठा- शेगाव येथून संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दांपत्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये पत्नीचा  जळून मृत्यू झाला 

आहेपरतुर तालुक्यातील कारळा येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके वय 35 आणि त्यांची पत्नी सविता अमोल सोळंके वय 32 हे काल सायंकाळी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. 

आज दिनांक 23 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कारळ्याकडे येत असताना मंठा ते लोणार रस्त्यावर असलेल्या महावीर जिनिंग जवळ त्यांची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 21 ए एक्स 77 55 ला अपघात झाला आणि या अपघातामध्ये सविता सोळंके या पूर्णता जळाल्या आहेत.

यासंदर्भात अमोल सोळंके यांचे भाऊ सोपान गंगाधर सोळंके वय 40 ,यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अमोल आणि सविता यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे ते नेहमीच शेगावला जायचे.

 दिनांक 22 रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या चुलत भावाची कार घेऊन ते शेगावला गेले होते. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास अमोल सोळंके यांचा त्यांना फोन आला आणि एका पिकप ने पाठीमागून धडक दिल्याचे त्यांनी सांगितले.

 त्यामुळे ते बाहर येऊन पिकप वाल्या सोबत बोलत असतानाच कारणे पेट घेतला आणि कार मध्ये असलेल्या सविता सोळंके या जळत होत्या, परंतु कारला मोठी आग लागल्याने ती विझवणे शक्य होत नसल्याची माहिती 

अमोल सोळंके यांनी सोपान सोळंके यांना दिली. त्यावेळी ते रडत होते त्यानंतर सोपान सोळुंके यांनी त्यांचे मामा कल्याण वायाळ आणि प्रताप वायाळ यांना ही माहिती दिल्यानंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि

 अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत कार आणि कार मधील सविता सोळंके या पूर्णता जळालेल्या होत्या.

यांनी घेतली घटनास्थळी धाव मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उपरे, 

परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंभोरे आणि त्यांचे सहकारी तसेच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आकाश राऊत, बनकर, घोडके सुभाष राठोड, राजू राठोड, नगरसेवक अच्युत बोराडे आणि मंठा अग्निशमन दलाचे जवान.

Post a Comment

0 Comments