google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ...सोलापूर अखेर सेतु कार्यालये सुरु होणार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ...सोलापूर अखेर सेतु कार्यालये सुरु होणार

ब्रेकिंग न्यूज ...सोलापूर  अखेर सेतु कार्यालये सुरु होणार

सोलापूर,  : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध तहसीलका र्यालयात यापूर्वी सुरु असलेले सेतू केंद्र बंद करण्यात आले होते. 


त्यामुळे विविध दाखल्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सुरु झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर पूर्वीप्रमाणे सेतू कार्यालये सुरु करावीत, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि 

राजकीय पक्षांनी केली होती. त्यावर जिल्हा सेतू समितीने पुन्हा हे सेतु कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यामुळे लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली आहे.

सेतू कार्यालये बंद झाल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.

त्यामुळे ई सेवा सेंटर वरती नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याने सेतु कार्यालये तातडीने सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती.

 त्यावर जिल्हा सेतु समितीने आता सेतु कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी लवकरच निविदा 

मागविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.त्यामुळे सर्वांच्या सोईसाठीचे सेतु कार्यालये आता सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

0 Comments