google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पाचेगांव येथे पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी आजपासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार डॉ.राज मिसाळ यांची माहिती

Breaking News

मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पाचेगांव येथे पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी आजपासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार डॉ.राज मिसाळ यांची माहिती

 मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पाचेगांव येथे पायी जाणार्‍या वारकर्‍यांसाठी


आजपासून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार डॉ.राज मिसाळ यांची माहिती

 सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी चालत जाणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, राज्याचे उपाध्यक्ष मा.आ. दीपकआबा साळुंखे- पाटील ट्रस्टच्या वतीने आज पासून आषाढी एकादशी पर्यंत मिरज- पंढरपूर हायवेवर पाचेगाव खुर्द येथे मोफत

 आरोग्य तपासणी शिबिराचे व तपासणी झाल्यानंतर मोफत औषध उपचाराचे नियोजन केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राज मिसाळ व माख् नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी दिली.

 मा.आ. दीपकआबा साळुंखे-पाटील चारिटेबल ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशीला पायी जाणार्‍या सर्व वारकर्‍यांना सलग  15 वर्षे मोफत तपासणी व औषधोपचार करण्याचे काम युध्द पातळी अखंडपणे सुरू आहे. 

आज दिनांक 23 जून पासून 24 तास पायी चालत जाणार्‍या वारकर्‍यांची तपासणी करून वारकर्‍यांच्या छोट्या मोठ्या आजारावर मोफत औषध उपचार केले जात आहेत. यासाठी तज्ञ डॉक्टरांचे टीम कार्यरत आहे. डॉ.अमित मिसाळ, अ‍ॅड. प्रतिभा बाबर, डॉ. महादेव जगताप, 

यांच्याशी कोळा व नाझरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या ठिकाणी काम पाहत आहेत तसेच या ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापर्यंत 30 हजार पायी जाणार्‍या वारकरी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आले आहेत.

 सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पायी दिंडी सहभागी होऊन पायी चालत पंढरपूरचा प्रवास करतात. त्यामुळे या ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत मोफत वारकर्‍यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करून वारकर्‍यांच्या सेवा करण्याचे काम हाती घेतले आहे.

 त्याचबरोबर पाचेगावकर यांच्या वतीने या पायी दिंडीत चालत जाणार्‍या वारकर्‍यांना मोफत चहा नाष्टा व दोन वेळचे जेवणाचे नियोजन केले जात आहे. मा.आ.दीपकआबा साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने

 प्रत्येक वर्षी माणदेशातील शिक्षण अध्यात्मिक, आरोग्य महिला पत्रकारिता, आधी विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संस्था व व्यक्ती यांना माणदेश भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते  या पुरस्कार समितीचे प्रमुख प्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव ढोबळे,

 मा.नगरसेवक सतिशभाऊ सावंत व राष्ट्रवादी शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील आहेत. या ट्रस्टचे माध्यम प्रयोजक म्हणून सतीशभाऊ सावंत यांचा सांगोला नगरी परिवार काम पहात आहे या ट्रस्टने आत्तापर्यंत वारकर्‍यांसाठी केलेल्या सेवेचे शासनाच्या आरोग्य विभागाने दखल घेतली आहे.

 राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी दखल घेऊन उत्कृष्ट केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले आहे वारकर्‍यांना पायी चालत जाताना या ट्रस्टने मोफत तपासणी करून औषधोपचार करत असल्याने वारकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments