भयंकर घटना... मित्राचा गळा चिरला अन्
त्याचे रक्त प्यायला पत्नीशी अनैतिक संबंधाचा होता संशय
बंगळुरू पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने धारदार शस्त्राने मित्राचा गळा चिरला आणि
नंतर त्याचे रक्त पिण्यास सुरुवात केली. शेजारी उभ्या असलेल्या आरोपीच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ बनविला.
कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यात १९ जून रोजी ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून
आरोपीला अटक केली. मारेश असे जखमी तरुणाचे, तर विजय असे आरोपीचे नाव आहे.
विजय व मारेश हे मित्र होते. आपल्या पत्नीचे मारेशसोबत अनैतिक संबंध असल्याचा विजयला संशय होता.
त्यामुळे त्याने मारेशला मारण्याचा कट रचून त्याला भेटण्यासाठी बोलावले. मित्र जॉनसोबत तो त्याला जंगलात घेऊन गेला. तेथे विजयने मारेशलामारेशचे प्राण वाचले
मित्राच्या हल्ल्यात जखमी मारेशला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या मारेशची प्रकृती ठीक आहे.
सबधाबाबत विचारणा केली. त्यावरून दोघांत हाणामारी झाली. रागाच्या भरात विजयने मारेशचा गळा चिरला व त्याचे रक्त पिणे सुरू केले. यादरम्यान बाजूला उभा असलेला त्याचा मित्र जॉनने या घटनेचा व्हिडीओ बनविला.
0 Comments