सोलापूरचा तरुण ठरला हिरो; केली ही कामगिरी
सोलापूर -पुण्यात दर्शना पवार प्रकरण ताजे असतांना अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला केला.
एका तरुणाच्या सतर्कतेमुळे या तरुणीच्या जीव वाचला. ही घटना आज सकाळी पुण्यातील मध्यवस्तीतील सदाशिव पेठत येथे घडली.
घटनास्थळांपासून काही अंतरावर पेरूगेट पोलिस चौकी आहे. दरम्यान, जमावाने या तरुणाला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून कोयत्याने तरुणीवर हल्ला केला.
ही तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर जात होती. यावेळी आरोपी तरुणाने दोघांना रस्त्यात अडवले. त्याने बॅगेतून आधी कोयता काढत तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तरुणीसोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला,
मात्र, त्याच्यावर देखील आरोपी तरुणाने हल्ला केला. दरम्यान, तरुणीचा मित्र जिवाच्या भीतीने पळत सुटला. यानंतर त्याने तरुणीकडे मोर्चा वळवला. त्याने तिचा कोयता घेऊन पाठलाग सुरू केला. जिवाच्या भीतीने तरुणी पळत सुटली.
यावेळी तिने मदतीसाठी अनेकांना हाका मारल्या पण कुणी पुढे आले नाही. दरम्यान, ही घटना एका तरुणाने पहिली त्याने आरोपीचा पाठलाग सुरू केला. आरोपी हा तरुणीला कोयत्याने मारणार तितक्यात त्या तरुणाने हाताने कोयता अडवत तरुणीचा जीव वाचवला.
लेशपाल जवळगे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. हा पण पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. तो अभ्यासिकेत जात असतांना त्याला तरुणी ही पळतांना दिसली.
त्याने प्रसंगावधान राखून तरुणीचा जीव वाचवला. त्याच्या या धडसाचे कौतुक होत आहे. दरम्यान हा सिनेस्टाईल थरार जवळगे याने सांगितला आहे. ती मुलगी वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती. जीवाच्या आकांताने ती पडत होती.
रस्त्यावरील नागरिक हा थरारक प्रसंग पाहत होते. मात्र तिच्या मदतीला कोणीच गेले नाही. मला मात्र हा प्रसंग पाहवाला नाही.
त्यामुळेच मी तिच्या मदतीला धावलो आणि तिचे प्राण वाचले, असे जवळगे यांनी सांगितले. जवळगे यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे
0 Comments