आषाढी वारी निमित्त साजरा होणारा बकरी ईद हा सण कोळे येथे दुसऱ्या दिवशी साजरा होणार...!
कोळे /( वाहिद आतार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
कोळे ता.सांगोला येथे हिंदू - मुस्लिम सामाजिक बांधलकी व बंधू मित्रता जपत कोळे येथे दि.29.06.2023 रोजी पंढरपूरची आषाढी एकादशी वारी व बकरी ईद सण सोबत
तिथीला आसल्या कारणाने कोळे येथे मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात येणारा बकरी ईद हा सण 30 जून रोजी साजरा करण्यात येईल व
दि.29.06.2023 रोजी फक्त नमाज पठन करून मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतील.कोळे येथे जामा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांची सामाजिक सलोखा व हिंदू - मुस्लिम सामाजिक बांधलकी बंधू मित्रता या वर चर्चा
होऊन महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुस्लिम समाजाकडून बकरी ईद सण हा दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 Comments